जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

संकष्टी चतुर्थीला रेडीच्या द्विभुज गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

संकष्टी चतुर्थीला रेडीच्या द्विभुज गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी!
“

पहाटेपासून भक्तांची गर्दी; फुलांची सजावट आणि फळांच्या आरासीत गणरायाचे मनोहारी रूप

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : संकष्टी चतुर्थीच्या पावन पर्वावर आज शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध रेडी येथील द्विभुज गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पहाटेपासूनच गणरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांची रीघ लागली होती. धार्मिक विधी, मंत्रोच्चार, पूजाअर्चा आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.




संकष्टी चतुर्थीनिमित्त रेडीच्या गणरायाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. रंगीबेरंगी फुलांसह फळांची सुंदर आरास आणि केळ्यांच्या घडांनी बाप्पाच्या मूर्तीचे सौंदर्य अधिकच खुलले होते. निसर्गरम्य परिसरात विराजमान झालेल्या गणरायाचे हे मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची विशेष गर्दी झाली होती.




कोणी आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी बाप्पाकडे साकडे घालत होते, तर कोणी जीवनातील संकटे दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होते. अनेक भाविकांनी गणरायाच्या चरणी नारळ, फुले अर्पण करून दर्शन घेतले. दूरवरून आलेल्या भक्तांसाठीही हा दर्शनसोहळा श्रद्धा आणि समाधानाचा अनुभव देणारा ठरला.




रेडीचा प्रसिद्ध द्विभुज गणपती हा भाविकांच्या श्रद्धेचे आणि अढळ विश्वासाचे स्थान मानला जातो. संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने पुन्हा एकदा या श्रद्धास्थानी भक्तीचा महासागर लोटल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वत्र घुमणारा गणरायाचा जयघोष आणि भक्तांच्या चेहऱ्यावरील समाधान यामुळे मंदिर परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.




श्रद्धा तीच, भक्ती तीच आणि प्रत्येकाच्या ओठांवर एकच जयघोष... गणपती बाप्पा मोरया!

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

चला... अनुभवूया कोकणच्या निसर्गसौंदर्याची अनोखी सफर
मनोरंजन

चला... अनुभवूया कोकणच्या निसर्गसौंदर्याची अनोखी सफर

अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पीडितांना नुकसानभरपाई तातडीने द्या!
प्रशासन

अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पीडितांना नुकसानभरपाई तातडीने द्या!

कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील CPHC प्रशिक्षण उपक्रमांचे मान्यवरांकडून कौतुक!
प्रशासन

कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील CPHC प्रशिक्षण उपक्रमांचे मान्यवरांकडून कौतुक!

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे वेळेत पूर्ण करून निधी खर्चाचे नियोजन करा!
प्रशासन

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे वेळेत पूर्ण करून निधी खर्चाचे नियोजन करा!

ANCHOR AD SLOT