जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

श्री.गांगेश्वर खर्जादेवी नवरात्रोत्सव तळेरे मंडळाचे कौतुक

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

श्री.गांगेश्वर खर्जादेवी नवरात्रोत्सव तळेरे मंडळाचे कौतुक
“

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक उपक्रमांसोबतच महिला शेतकऱ्यांसाठी उपयुक्त उपक्रम

कणकवली प्रतिनिधी✍️: श्री गांगेश्वर-खर्जादेवी नवरात्रोत्सव मंडळ, तळेरे यांच्या वतीने येथील श्री गांगेश्वर मंदिरात महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा ९० महिला भगिनींनी लाभ घेतला.

महिला शेतकऱ्यांना शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी करण्याची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अद्याप ज्या महिलांनी शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी केलेली नाही, अशा महिलांनाही या सुविधेचा लाभ घेता यावा, यासाठी मंडळाच्या वतीने शिबिर आणखी एक दिवस वाढविण्यात आले.

या शिबिराच्या आयोजनासाठी कृषी सहाय्यक पाटील, तळेरे,उपसरपंच संदीप घाडी, निलेश सोरप, राजेश जाधव आणि पत्रकार अंकित घाडीगावकर यांचे सहकार्य लाभले.नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक उपक्रमांसोबतच महिला शेतकऱ्यांसाठी उपयुक्त उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न श्री गांगेश्वर-खर्जादेवी नवरात्रोत्सव मंडळाने केला आहे. मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर
सामाजिक

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर

पोलिसांच्या कल्याणासाठी भविष्यातही स्वतंत्रपणे निर्णय घेणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
प्रशासन

पोलिसांच्या कल्याणासाठी भविष्यातही स्वतंत्रपणे निर्णय घेणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा
सांस्कृतिक

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!
सामाजिक

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!

ANCHOR AD SLOT