जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

थुमिडीहेट्टी प्रकल्पाबाबत महाराष्ट्राची सकारात्मक भूमिका

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

थुमिडीहेट्टी प्रकल्पाबाबत महाराष्ट्राची सकारात्मक भूमिका
“

बुडीत क्षेत्राचा स्वतंत्र अभ्यास करूनच तेलंगणाला सहकार्य; मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती

मुंबई प्रतिनिधी✍️: तेलंगणातील थुमिडीहेट्टी बॅरेज प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्यासह दोन्ही राज्यांच्या शिष्टमंडळाची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि जलसंपदा मंत्री उत्तमकुमार रेड्डी यांनी प्रकल्पाची माहिती देत थुमिडीहेट्टी बॅरेजची उंची १४८ मीटरवरून १५२ मीटरपर्यंत वाढविण्यास महाराष्ट्राने मान्यता द्यावी, अशी विनंती केली.




मुख्यमंत्री फडणवीस यांनी तेलंगणाच्या या प्रस्तावाबाबत महाराष्ट्राकडून स्वतंत्रपणे अभ्यास करण्यात येईल, असे स्पष्ट केले. दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव तसेच जलसंपदा विभागाच्या सचिवांची संयुक्त समिती स्थापन करून प्रकल्पाशी संबंधित तांत्रिक बाबी आणि महाराष्ट्रातील संभाव्य बुडीत क्षेत्राचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यासानंतर महाराष्ट्रातील नागरिकांच्या हिताचे संरक्षण करत तेलंगणाला सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.




शेजारील राज्यांच्या प्रश्नांवर परस्पर सहकार्याने तोडगा काढण्याची भूमिका महाराष्ट्राने सातत्याने घेतली आहे. महाराष्ट्रातील नागरिकांचे नुकसान होत नसेल आणि त्यातून अन्य राज्याला लाभ मिळत असेल, तर सकारात्मक निर्णय घेण्यास राज्याची हरकत नसल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. यापूर्वीही महाराष्ट्राने तेलंगणाच्या या प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, पूर्वीच्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष बुडीत क्षेत्र अपेक्षेपेक्षा अधिक वाढल्याचे निदर्शनास आल्याने नव्या प्रस्तावाचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




बुडीत क्षेत्रासह अभयारण्याचाही होणार अभ्यास




प्रकल्पाचे ठिकाण बदलल्यामुळे बुडीत क्षेत्रावर होणारा परिणाम, संबंधित अभयारण्याचा समावेश तसेच नदीपात्राबाहेरील आवश्यक जमिनीचे क्षेत्र यांचाही संयुक्त समितीमार्फत अभ्यास केला जाणार आहे. महाराष्ट्राने केलेल्या अभ्यासाबाबत तेलंगणाकडून काही आक्षेप किंवा त्रुटी निदर्शनास आणून दिल्यास दोन्ही राज्यांचे अधिकारी त्यावर चर्चा करून योग्य तो मार्ग काढतील. आवश्यकता भासल्यास या प्रक्रियेत तज्ज्ञांचे मतही घेण्यात येणार आहे.




नागरिकांच्या हिताला प्राधान्य




थुमिडीहेट्टी प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील नागरिकांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची खात्री करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत स्पष्ट केली. त्यामुळे प्रकल्पाच्या उंचीवाढीबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तांत्रिक बाबी आणि संभाव्य बुडीत क्षेत्राचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.




या बैठकीला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे दूरदृश्यप्रणालीद्वारे, तेलंगणाचे जलसंपदा मंत्री उत्तमकुमार रेड्डी, महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, तेलंगणाचे मुख्य सचिव संजय जाजू यांच्यासह दोन्ही राज्यांतील संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर
सामाजिक

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!
सामाजिक

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!
प्रशासन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

ANCHOR AD SLOT