जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात दिव्यांग मेळावा उत्साहात साजरा

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात दिव्यांग मेळावा उत्साहात साजरा
“

वाढदिवसाचा आनंद सामाजिक उपक्रमांतून साजरा

वेंगुर्ला प्रतिनिधी ✍️: विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात दिव्यांग मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.दीडशे दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रमजागतिक पांढरी काठी दिन व भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालयात आयोजित दिव्यांग मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात सुमारे दीडशे दिव्यांग बांधव सहभागी झाले. यावेळी त्यांना सपोर्ट स्टिक, पांढऱ्या काठ्या तसेच आवश्यक कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी फोल्डरचे वाटप करण्यात आले.भाजपा दिव्यांग विकास आघाडी, सिंधुदुर्ग, कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मेळाव्याचे उद्घाटन वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास गवडळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, भाजपा दिव्यांग जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे , साहस प्रतीष्ठानच्या रुपाली पाटील मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

राजन गिरप म्हणाले, दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आवश्यक सुविधा आणि मदत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे सहानुभूतीने नव्हे, तर समानतेच्या आणि सन्मानाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. दिव्यांग बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना मदतीचा हात देणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहेत. प्रसन्ना देसाई म्हणाले, विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा मेळावा म्हणजे सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक प्रयत्न आहे. समाजातील दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमांतून समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो.अनिल शिंगाडे म्हणाले, दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना आवश्यक साधने आणि शासकीय योजनांची माहिती मिळाल्यास त्यांचे जीवन अधिक सुलभ होऊ शकते. दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांना योग्य सुविधा मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. या मेळाव्यात वाटप करण्यात आलेल्या सपोर्ट स्टिक आणि पांढऱ्या काठ्यांमुळे दिव्यांग बांधवांना दैनंदिन हालचालींसाठी मदत होणार आहे. तसेच कागदपत्रे ठेवण्यासाठी दिलेल्या फोल्डरचाही त्यांना उपयोग होणार आहे. वाढदिवसाचा आनंद सामाजिक उपक्रमांतून साजरा करण्याच्या भूमिकेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसन्ना देसाई यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. सचिन वासुदेव परुळकर यांनी केले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दुष्काळ निवारणासह जनगणना, एसआयआरची कामे प्राधान्याने पूर्ण करा!
प्रशासन

दुष्काळ निवारणासह जनगणना, एसआयआरची कामे प्राधान्याने पूर्ण करा!

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे वेळेत पूर्ण करून निधी खर्चाचे नियोजन करा!
प्रशासन

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे वेळेत पूर्ण करून निधी खर्चाचे नियोजन करा!

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

सिंधुदुर्गात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आमदार निलेश राणे
सामाजिक

सिंधुदुर्गात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आमदार निलेश राणे

ANCHOR AD SLOT