जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

आकारीपड जमिनींच्या न्यायालयीन लढ्याचे श्रेय शेतकऱ्यांनाच; निलेश राणेंनी श्रेय लाटू नये मा.आ. वैभव नाईक

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आकारीपड जमिनींच्या न्यायालयीन लढ्याचे श्रेय शेतकऱ्यांनाच; निलेश राणेंनी श्रेय लाटू नये मा.आ. वैभव नाईक
“

दहा वर्षांच्या संघर्षानंतर शेतकऱ्यांना न्याय; प्रमोद शेडगे व सहकारी शेतकऱ्यांच्या लढ्याचे माजी आमदारांकडून कौतुक

कुडाळ प्रतिनिधी✍️: आकारीपड जमिनींचा प्रश्न न्यायालयीन लढ्यातून मार्गी लागण्यामागे शेतकरी प्रमोद शेडगे आणि त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. या लढ्यासाठी शेतकऱ्यांनी दहा वर्षे आर्थिक भार सहन केला असून, कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा नेत्याची मदत घेतलेली नाही. त्यामुळे या न्यायालयीन लढ्याचे श्रेय आमदार निलेश राणे यांनी स्वतःकडे घेऊ नये, असे आवाहन कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.




आकारीपड जमिनींचा प्रश्न साधारणपणे १९७३ पूर्वीपासून प्रलंबित आहे. शेतसारा न भरलेल्या जमिनींची नोंद तत्कालीन सरकारने ‘आकारीपड’ म्हणून केली होती. या जमिनींचा प्रत्यक्ष ताबा मूळ मालकांना आणि त्यांच्या वारसांना मिळावा, यासाठी २०१६ मध्ये शेतकरी प्रमोद शेडगे आणि कुडाळमधील अन्य शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर तब्बल दहा वर्षे स्वतःचा आर्थिक भार सोसत त्यांनी न्यायालयीन लढा सुरू ठेवला. या प्रक्रियेत त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्याची मदत घेतली नव्हती. आपण आमदार असतानाही शेतकऱ्यांनी आपली मदत घेतली नव्हती, असे नाईक यांनी स्पष्ट केले.




प्रमोद शेडगे आणि सहकारी शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना दहा वर्षांनंतर यश मिळाले असून, २९ सप्टेंबर १९८७ रोजी आकारीपड जमिनींचा प्रत्यक्ष ताबा असलेल्या मूळ मालकांना आणि त्यांच्या वारसांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय संबंधित शेतकऱ्यांचेच असल्याचे नाईक यांनी नमूद केले.




आमदार निलेश राणे पत्रकार परिषद घेऊन आकारीपड जमिनींचा प्रश्न आपण आणि आपल्या सरकारने सोडविल्याचे चित्र निर्माण करत असल्याचा आरोपही वैभव नाईक यांनी केला. हा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेतून निकाली निघाला आहे. सरकारच्या विरोधातच शेतकऱ्यांनी याचिका दाखल केली होती. न्यायालय पुराव्यांच्या आधारे निर्णय देते. त्यामुळे न्यायालयीन कामकाजात लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप चालत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.




महायुती सरकार गेली साडेतीन वर्षे सत्तेत असतानाही आकारीपड जमिनींचा प्रश्न सरकारने सोडविला नाही. सरकारला हा प्रश्न मार्गी लावायचा असता, तर शेतकऱ्यांना न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागली नसती, असा टोलाही नाईक यांनी लगावला.




२० जून २०१९ रोजी राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आकारीपड जमिनींबाबत निर्णय घेतला होता. मात्र, त्या निर्णयातील जाचक अटींना आपण स्थानिक आमदार म्हणून विरोध दर्शविला होता. तरीही मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने हा प्रश्न प्रलंबितच राहिला. अखेर शेतकऱ्यांनी न्यायालयीन मार्गाने लढा देत तो सोडविला. हा सरकारविरोधातील शेतकऱ्यांचा विजय असून, त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यामुळे विद्यमान सरकार किंवा आमदार निलेश राणे यांनी या यशाचे श्रेय घेऊ नये, असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!
प्रशासन

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!
प्रशासन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!

पोलिसांच्या कल्याणासाठी भविष्यातही स्वतंत्रपणे निर्णय घेणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
प्रशासन

पोलिसांच्या कल्याणासाठी भविष्यातही स्वतंत्रपणे निर्णय घेणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

ANCHOR AD SLOT