जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

आकाश फिश मिलच्या मच्छी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा बंदोबस्त करा!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आकाश फिश मिलच्या मच्छी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा बंदोबस्त करा!
“

दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे म्हापण, पाट, हुमरमळा, माड्याचीवाडी परिसरातील नागरिक त्रस्त; अतुल बंगे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार

कुडाळ प्रतिनिधी✍️ : केळूस येथील आकाश फिश मिल कंपनीच्या मच्छी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सांडत असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, संबंधित वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ घेऊन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची भेट घेणार असल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी दिली.




गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळी मच्छी वाहतूक करणाऱ्या गाड्यांची या परिसरातून मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू आहे. म्हापण, पाट, हुमरमळा आणि माड्याचीवाडी या मार्गांवरून जाताना गाड्यांमधील मच्छीचे पाणी रस्त्यावर पडत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची भीतीही व्यक्त होत आहे.




केळूस येथील आकाश फिश मिल कंपनीबाबत यापूर्वीही वारंवार तक्रारी झाल्या आहेत. त्यातच आता मच्छी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सांडण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्या समस्येत आणखी भर पडली आहे.




या गंभीर समस्येची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, मच्छी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून रस्त्यावर पाणी सांडणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश द्यावेत आणि संबंधित प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार असल्याचे अतुल बंगे यांनी स्पष्ट केले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!
प्रशासन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!
सामाजिक

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!
प्रशासन

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!

ANCHOR AD SLOT