जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

अदानी स्मार्ट मीटर बसविण्यास आमदार निलेश राणेंचा पाठींबा

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

अदानी स्मार्ट मीटर बसविण्यास आमदार निलेश राणेंचा पाठींबा
“

निलेश राणेंच्या दुटप्प्या भूमिकेवर शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांची टीका

सिंधुदुर्ग प्रतिनिधी ✍️अदानी स्मार्ट विद्युत मीटरचे ज्यादा बिल येत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जबरदस्तीने हे स्मार्ट मीटर बसविले जात असल्याने जिल्ह्यातील जनता मेटाकुटीला आली आहे. स्मार्ट मीटरला सर्व स्तरातून विरोध केला जात आहे. जबरदस्तीने बसविल्या जाणाऱ्या या अदानी स्मार्ट मीटर विरोधात आमदार निलेश राणेंनी देखील पावसाळी अधिवेशनात आवाज उठवून त्याला विरोध केला होता. जिल्ह्यातील जनतेनेही त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले होते. परंतु आ. निलेश राणेंनी वेगळ्याच हेतूने हा विरोध केला होता हे जनतेला ठाऊक नव्हते. तो हेतु साध्य झाल्यानंतर आ. निलेश राणे यांनी परस्पर आपली भूमिका बदलून स्मार्ट मीटरचे आता ते समर्थन करत आहेत. स्मार्ट मीटर बसविण्याबाबत आमदार निलेश राणे सकारात्मक असून त्यांचा पाठींबा असल्याची माहिती महावितरणचे कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता जयंतीलाल भामरे यांनी दिली असून त्यांची याबाबतची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. त्यामुळे निलेश राणेंची दुटप्पी भूमिका जिल्हावासीयांसमोर उघड झाली असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी केली आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!
प्रशासन

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!
प्रशासन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!

पोलिसांच्या कल्याणासाठी भविष्यातही स्वतंत्रपणे निर्णय घेणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
प्रशासन

पोलिसांच्या कल्याणासाठी भविष्यातही स्वतंत्रपणे निर्णय घेणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

ANCHOR AD SLOT