जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

एसटी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

एसटी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन
“

महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई ठाकुर्ली प्रतिनिध✍️ :एसटी प्रवासातील विविध सवलतींचा लाभ नागरिकांना सहज मिळावा, यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




एसटी महामंडळाच्या नियमानुसार १२ वर्षांवरील सर्व मुली व महिलांना ५० टक्के प्रवास सवलत देण्यात येते. तसेच ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के प्रवास सवलत, तर ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात १०० टक्के सवलत म्हणजेच मोफत प्रवासाचा लाभ मिळतो.




स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी संबंधित व्यक्तीने स्वतः उपस्थित राहणे आवश्यक असून, आधार कार्ड सोबत आणणे गरजेचे आहे. नोंदणीसाठी शासकीय दर आकारण्यात येणार आहेत.




हे शिबिर जुन्या हनुमान मंदिराजवळ, चोळेगाव, ठाकुर्ली (पूर्व) येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.




या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याण जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रदीप शरद चौधरी आणि नगरसेविका सौ. शारदा प्रदीप चौधरी यांनी केले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!
प्रशासन

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!
प्रशासन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!

पोलिसांच्या कल्याणासाठी भविष्यातही स्वतंत्रपणे निर्णय घेणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
प्रशासन

पोलिसांच्या कल्याणासाठी भविष्यातही स्वतंत्रपणे निर्णय घेणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

ANCHOR AD SLOT