जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

जैन समाजातील ५११ लाभार्थ्यांना ५१ कोटींच्या कर्जाचे वितरण

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

जैन समाजातील ५११ लाभार्थ्यांना ५१ कोटींच्या कर्जाचे वितरण

मुंबई प्रतिनिधी✍️: घाटकोपर येथील आराध्य भक्ती पार्क येथे जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जैन समाजातील लाभार्थ्यांना विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देण्यात आले. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना कर्जवितरणाचे धनादेश प्रदान करण्यात आले.


शेठ वालचंद हिराचंद स्वयंरोजगार कर्ज व्याज परतावा योजना, कर्मवीर भाऊराव पाटील उच्च शिक्षण कर्ज योजना आणि महिला बचत गट कर्ज योजना या तीन योजनांच्या पहिल्या टप्प्यात एकूण ५११ लाभार्थ्यांना ५१ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले.


जैन समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वावलंबी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून व्याजमुक्त कर्ज, नवउद्योजकता तसेच स्वयंरोजगाराला प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले. जैन समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


प्राकृत, संस्कृत आणि मराठी साहित्याच्या देवाणघेवाणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाईल, असेही मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी नमूद केले.


कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, प्रमुख संयोजक पराग शाह, महामंडळाचे समन्वयक संदीप भंडारी, जैन मुनी नम्र मुनी महाराज, साध्वी तसेच जैन समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जैन समाजाने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. समाजातील प्रत्येक व्यक्तीने किमान १०० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करून शासनाच्या मदतकार्यात सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.


जैन धर्माची परंपरा प्राचीन असून भारतीय संस्कृतीशी तिचे अतूट नाते आहे. व्यापक सांस्कृतिक एकात्मतेच्या भावनेतून समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे वाटचाल करावी, असे आवाहनही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!
सामाजिक

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!
प्रशासन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!
प्रशासन

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!

ANCHOR AD SLOT