वेंगुर्ला प्रतिनिधी✍️: रेडी येथील कै. चंद्रकांत उर्फ निलेश राऊळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त रेडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रितेश राऊळ मित्र मंडळ, रेडी यांच्या वतीने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र, रेडी येथे आयोजित करण्यात आले आहे.
रक्तदान हे गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारे सामाजिक कार्य असून, या उपक्रमाच्या माध्यमातून कै. चंद्रकांत उर्फ निलेश राऊळ यांच्या स्मृतींना सामाजिक उपक्रमातून अभिवादन करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिक, युवक आणि रक्तदात्यांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन प्रितेश राऊळ मित्र मंडळ, रेडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.