जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

आरोग्य भवनात कुपोषण व माता-बालमृत्यू नियंत्रण कृती दलाच्या कार्यालयाचे उद्घाटन

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आरोग्य भवनात कुपोषण व माता-बालमृत्यू नियंत्रण कृती दलाच्या कार्यालयाचे उद्घाटन
“

कुपोषण निर्मूलनासह संसर्गजन्य रोग नियंत्रणासाठी समन्वयाने काम करण्याचे डॉ. दीपक सावंत यांचे आवाहन

मुंबई प्रतिनिधी✍️: राज्यातील कुपोषणाचे निर्मूलन, माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे तसेच संसर्गजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाच्या कार्यालयाचे उद्घाटन आरोग्य भवन, मुंबई येथे करण्यात आले. कुपोषण निर्मूलन, बालमृत्यू, मातामृत्यू तसेच संसर्गजन्य रोग नियंत्रणासंबंधी कृती दल, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व मंत्री दर्जा असलेले डॉ. दीपक प्रमोदिनी रामचंद्र सावंत यांच्या कार्यालयाचे हे उद्घाटन झाले.




या कार्यक्रमाला आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, शहरी आरोग्य अभियान आयुक्त डॉ. सुनील भोकरे, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक राजेंद्र भालेराव, माध्यम सल्लागार (मा. मंत्री कार्यालय) डॉ. कैलास बाविस्कर यांच्यासह आरोग्य विभागातील विविध अधिकारी उपस्थित होते.




यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सावंत यांनी कुपोषण निर्मूलन, माता व बालमृत्यू रोखणे आणि संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात व्यापक व नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची गरज व्यक्त केली. या सर्व बाबींवर परिणामकारक काम करण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील विविध घटकांमध्ये समन्वय असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.




प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजनांना अधिक प्रभावी करण्यासोबतच नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे आणि उपलब्ध आरोग्य सेवांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यावर भर देण्याचे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. कुपोषण, माता-बालमृत्यू आणि संसर्गजन्य रोग या आव्हानांवर मात करण्यासाठी विविध विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.




‘सुदृढ माता, निरोगी बालके आणि रोगमुक्त महाराष्ट्र’ या उद्दिष्टाच्या दिशेने सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

संविधान दिनानिमित्त वेंगुर्ल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित वेशभूषा स्पर्धा
सामाजिक

संविधान दिनानिमित्त वेंगुर्ल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित वेशभूषा स्पर्धा

दाभोलीत २५ व २७ नोव्हेंबरला सातेरी-गिरोबा जत्रोत्सवाचा उत्साह; दशावतार नाटकांची मेजवानी
सांस्कृतिक

दाभोलीत २५ व २७ नोव्हेंबरला सातेरी-गिरोबा जत्रोत्सवाचा उत्साह; दशावतार नाटकांची मेजवानी

तुळशी विवाह : भक्ती, श्रद्धा आणि मांगल्याचा पवित्र सोहळा!
सांस्कृतिक

तुळशी विवाह : भक्ती, श्रद्धा आणि मांगल्याचा पवित्र सोहळा!

ANCHOR AD SLOT