जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

महिला शक्तीने एकाच दिवशी तब्बल तीन वनराई बंधारे बांधले

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

महिला शक्तीने एकाच दिवशी तब्बल तीन वनराई बंधारे बांधले
“

महिलांनी जलसंवर्धनाचे महत्त्व कृतीतून पटवून दिले

वेंगुर्ला प्रतिनिधी ✍️आगामी काळात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासन स्तरावर जलसंधारणाच्या कामांना गती दिली जात असतानाच, वेंगुर्ला तालुक्यातील आसोली येथील सखी महीला ग्राम संघाच्या वतीने गावातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन या महिला शक्तीने एकाच दिवशी तब्बल तीन वनराई बंधारे बांधून एक आदर्श निर्माण केला. यावेळी सखी‌ महीला ग्राम संघाचे पदाधिकारी, सर्व सी.आर.पी, कॅटर्स उपसरपंच ग्रामसंघ अंतर्गत येणाऱ्या सर्व महिला वर्ग आदी सहभाग घेऊन बंधारे बांधले.उभादांडा प्रभाग समन्वयक सागर आवळेगावकर यांनी उपस्थिती लावली.यावेळी आसोली गावातील सी.आर.पी. संपदा साईनाथ नाईक पूजा प्रल्हाद तुळसकर अवनी अमित गावडे आरती अरुण सांगळे रूपा रघुनाथ चव्हाण ग्राम संघ पदाधिकारी श्रीम.रिया रमेश धुरी कविता कृष्णा धूरी वैष्णवी विकास कांबळी आदी‌ महीला उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी जपत महीला स्त्री शक्तीने आदर्श उपक्रम राबविला एकत्र येत श्रमदानातून वनराई बंधारे उभारले. पालकमंत्री नितेश राणे तसेच जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त वनराई बंधारे उभारण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हाभरात ग्रामपंचायत स्तरावर पाणी अडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच उपक्रमातून प्रेरणा घेतली व पुढाकार घेत प्रत्यक्ष कृतीतून जलसंधारणात सहभाग नोंदविला. पावसाचे पाणी अडवून त्याचा जमिनीत निचरा व्हावा आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. ‘पाणी हेच जीवन; त्याचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी!’ ही भावना मनात ठेवून या महिलांनी जलसंवर्धनाचे महत्त्व कृतीतून पटवून दिले.आजच्या महिलांनी सामाजिक प्रश्नांबाबत जागरूक राहून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतल्यास भविष्यातील पाणी संकटावर मात करणे शक्य होईल व श्रमदान प्रेरणादायी ठरणारे असे सांगितले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!
सामाजिक

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!
प्रशासन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!
प्रशासन

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!

ANCHOR AD SLOT