सावंतवाडी प्रतिनिधी ✍️प्राथमिक आरोग्य केंद्र मळेवाड येथे शुक्रवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी जनआरोग्य समितीची सभा जि.प.सदस्य मळेवाड मतदार संघ श्रीम.अपर्णा सातोसकर व जि.प.सदस्य सुदन कवठणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाली.या सभेत समितीची पुनर्रचना,मागील सभेचे इतिवृत्त,सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील निधी व प्रलंबित देयके याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.यावेळी डॉ रमेश कर्तस्कर,डॉ विक्रम मस्के,डॉ अदिती ठाकूर, उमाजी राणे,श्रीम सावंत,श्रीम धनश्री मराठे,उदय परिपत्ये,श्रीम कांबळी,संजय पिळणकर,हेमंत मराठे,शंकर परब आरोग्य सहाय्यक सावंतवाडी,प्रभू आजगावकर,छाया घाडीगावकर प्रभारी महिला व बाल विकास विभाग व सर्व जन आरोग्य समिती सदस्य उपस्थित होते.
आरोग्यविषयक कामांचा आढावा घेताना केंद्राच्या मालकीच्या विहिरीवर पाण्याचा पंम्प तात्काळ बसविण्या बाबत निर्णय घेण्यात आला.तसेच आशाताईंचा त्यांच्या उत्कृष्ठ सेवेबद्दल नजिकच्या काळात सन्मान करण्याचा ठराव घेण्यात आला.यावेळी सचिव यु टी राणे यांनी माता बाल संगोपन कार्यक्रमा अंतर्गत मळेवाड प्रा.आरोग्य केंद्राचा एप्रिल ते सप्टेंबर अखेर जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याची माहिती सभेत दिली.याबाबत अभिनंदनाचा विशेष ठराव घेण्यात आला.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जमिनीबाबत चर्चा करण्यात आली. या सभेत दि ५ ऑगस्ट २०२६ च्या सुधारित शासन निर्णयानुसार जनआरोग्य समिती गठित करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली.तसेच दि २३ जून २०२६ रोजी झालेल्या मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक कामांचा आढावा घेऊन आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने विविध बाबींवर विचारमंथन करण्यात आले.समितीच्या अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी उपस्थित करण्यात येणाऱ्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.यात केंद्राला शवपेटी उपलब्ध झाली असल्याचे यावेळी सचिवांनी सांगितले.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे,आरोग्य केंद्राच्या कामकाजात सुधारणा करणे आणि समितीच्या माध्यमातून आरोग्यविषयक उपक्रमांना चालना देणे,या दृष्टीने या सभेला महत्त्व प्राप्त झाले.