जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

न्यायालयीन युक्तिवादाला क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकारांची जोड!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

न्यायालयीन युक्तिवादाला क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकारांची जोड!
“

सिंधुदुर्ग ॲडव्होकेट्स प्रीमियर लीग २०२६ उत्साहात; पुरुष गटात सिंधुदुर्ग वॉरियर्स, तर महिला गटात व्हिक्टरी व्हाइब्स विजेते

न्यायालयात कायद्याच्या माध्यमातून न्यायासाठी युक्तिवाद करणाऱ्या वकील बांधवांनी क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खेळाचा जलवा दाखवत स्पर्धेत रंगत आणली. वकिली व्यवसायातील व्यस्त दिनक्रमातून विरंगुळा मिळावा, तसेच जिल्ह्यातील वकिलांमध्ये स्नेहभाव, एकोपा आणि खिलाडूवृत्ती वाढीस लागावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग ॲडव्होकेट्स प्रीमियर लीग २०२६ या टर्फ क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत पुरुष गटात सिंधुदुर्ग वॉरियर्सने, तर महिला गटात व्हिक्टरी व्हाइब्सने विजेतेपद पटकावले.




अणाव-हुमरमळा येथील पालव टर्फ मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजीव बिले, जिल्हा वकील संघटनेचे उपाध्यक्ष विवेक ऊर्फ बंड्या मांडकुळकर, कुडाळ तालुका अध्यक्ष ॲड. गौरव पडते, ॲड. गौरी देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. ॲड. जान्हवी दुभवडकर यांनी सूत्रसंचालन केले.




उद्घाटनप्रसंगी ॲड. राजेंद्र रावराणे यांनी कला आणि क्रीडा क्षेत्रामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, असे सांगितले. वकिली व्यवसायातील ताणतणावातून काही काळ बाहेर पडून सहकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी अशा स्पर्धांमुळे मिळते, असे त्यांनी नमूद केले. तर ॲड. राजीव बिले यांनी खेळामुळे मैत्री, खिलाडूवृत्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. विजयाचा आनंद घेतानाच पराभवही खिलाडूवृत्तीने स्वीकारण्याची मानसिकता खेळातून निर्माण होते, असे मत व्यक्त केले.




या स्पर्धेत पुरुषांचे आठ आणि महिलांचे दोन असे एकूण दहा संघ सहभागी झाले होते. ब्लॅक कोट ब्लास्टर्स, सेकंड स्टार्स, कणकवली बार असोसिएशन, लिहर किलर्स, सिंधुदुर्ग वॉरियर्स, व्हिक्टरी लाइन्स, सिंधुकन्या, युनायटेड सावंतवाडी, वेंगुर्ला स्टार आणि कोकण स्मॅशर्स या संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. पुरुष गटात सिंधुदुर्ग वॉरियर्सने विजेतेपदावर नाव कोरले, तर महिला गटात व्हिक्टरी व्हाइब्सने बाजी मारली.




स्पर्धेचे आयोजन ॲड. दत्ताराम बिले, ॲड. विनय मांडकुलकर, ॲड. सुयश गवंडे आणि ॲड. सौरव देसाई यांनी केले होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे संघमालक, खेळाडू, ज्येष्ठ विधिज्ञ, वकील बांधव आणि प्रेक्षकांचे आयोजकांनी आभार मानले.




न्यायालयीन कामकाजाच्या पलीकडे जाऊन वकील बांधवांना एकत्र आणणाऱ्या या स्पर्धेमुळे जिल्ह्यात मैत्री, एकोपा आणि क्रीडाभावनेचे सुंदर दर्शन घडले. कायद्याच्या मैदानातील युक्तिवादानंतर क्रिकेटच्या मैदानावर रंगलेला हा जल्लोष सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

संविधान दिनानिमित्त वेंगुर्ल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित वेशभूषा स्पर्धा
सामाजिक

संविधान दिनानिमित्त वेंगुर्ल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित वेशभूषा स्पर्धा

दाभोलीत २५ व २७ नोव्हेंबरला सातेरी-गिरोबा जत्रोत्सवाचा उत्साह; दशावतार नाटकांची मेजवानी
सांस्कृतिक

दाभोलीत २५ व २७ नोव्हेंबरला सातेरी-गिरोबा जत्रोत्सवाचा उत्साह; दशावतार नाटकांची मेजवानी

तुळशी विवाह : भक्ती, श्रद्धा आणि मांगल्याचा पवित्र सोहळा!
सांस्कृतिक

तुळशी विवाह : भक्ती, श्रद्धा आणि मांगल्याचा पवित्र सोहळा!

ANCHOR AD SLOT