जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

पत्रकारांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पत्रकारांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल!
“

अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील यांना कारणे दाखवा नोटीस; २४ तासांत खुलासा देण्याचे आदेश

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️ : प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबाबत अपमानास्पद भाषा वापरणे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील यांच्या अंगलट आले आहे. ‘फोटो काढणाऱ्याला उचलून फेकून द्या’, या त्यांच्या कथित वक्तव्याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावून नोटीस मिळाल्यापासून २४ तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. समाधानकारक खुलासा न मिळाल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येईल, असेही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.




राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे २१ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात स्वच्छता आणि अन्य पूर्वतयारीची कामे सुरू होती. या कामांच्या ठिकाणी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित असताना अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून छायाचित्रण करणाऱ्या व्यक्तीला उचलून फेकून देण्याच्या आशयाचे वक्तव्य केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. शक्तिपथ Live सह अन्य माध्यमांनीही आणि आपण आता वाचत असलेल्या जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल‌ने पण या घटनेची वाच्यता करून प्रसिद्धी दिली होती.




या प्रकाराची दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी २३ नोव्हेंबर रोजी संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली. शासकीय सेवेत महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडून सार्वजनिक ठिकाणी वावरताना तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना शासकीय शिष्टाचार, संयम आणि सौजन्य अपेक्षित असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.




संबंधित अधिकाऱ्याने पत्रकारांसमोर वापरलेली भाषा आणि केलेले वर्तन हे गंभीर स्वरूपाचे असल्याचे निरीक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. अशा प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होत असल्याचेही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे २४ तासांच्या अल्प मुदतीत खुलासा मागवून प्रशासनाने या प्रकरणाला गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे.




या नोटिशीची प्रत सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त आणि जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांनाही पाठविण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची माहिती वरिष्ठ प्रशासकीय स्तरावरही पोहोचली आहे.




लोकशाहीमध्ये पत्रकारिता ही चौथा स्तंभ म्हणून ओळखली जाते. जनतेचे प्रश्न, स्थानिक समस्या आणि शासकीय कामकाजातील बाबी समाजासमोर आणण्याचे काम पत्रकार करतात. अशा परिस्थितीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना शासकीय अधिकाऱ्यांनी सन्मानपूर्वक आणि संयमित भूमिका घेणे अपेक्षित आहे. आता अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील या नोटिशीला काय उत्तर देतात आणि जिल्हा प्रशासन त्यावर पुढे कोणती कारवाई करते, याकडे जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रासह प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

चला... अनुभवूया कोकणच्या निसर्गसौंदर्याची अनोखी सफर
मनोरंजन

चला... अनुभवूया कोकणच्या निसर्गसौंदर्याची अनोखी सफर

संकष्टी चतुर्थीला रेडीच्या द्विभुज गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी!
सांस्कृतिक

संकष्टी चतुर्थीला रेडीच्या द्विभुज गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी!

अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पीडितांना नुकसानभरपाई तातडीने द्या!
प्रशासन

अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पीडितांना नुकसानभरपाई तातडीने द्या!

कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील CPHC प्रशिक्षण उपक्रमांचे मान्यवरांकडून कौतुक!
प्रशासन

कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील CPHC प्रशिक्षण उपक्रमांचे मान्यवरांकडून कौतुक!

ANCHOR AD SLOT