जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संघटन मजबूत करणे आवश्यक राजन नाईक

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संघटन मजबूत करणे आवश्यक   राजन नाईक
“

वेंगुर्ल्यात देवळी समाजाचा स्नेहमेळावा उत्साहात; २१ गुणवंत विद्यार्थी आणि ४३ ज्येष्ठ नागरिकांचा गौरव

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️: शाखेच्या वतीने १९९८ पासून समाज मेळावा, गुणवंत विद्यार्थी गौरव आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा सन्मान करण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे. या उपक्रमाचे विशेष कौतुक करत राजन नाईक यांनी तालुकाध्यक्ष रमेश नरसुले व त्यांच्या कार्यकारिणीचे अभिनंदन केले. भविष्यातही अशाच विधायक उपक्रमांचे आयोजन करून जिल्ह्यातील समाज बांधवांना एकत्र आणण्याचे आवाहन त्यांनी केले.




कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत समाज बांधवांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन व ईशस्तवनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेले दोन, प्रज्ञाशोध परीक्षा उत्तीर्ण दोन, दहावी परीक्षेत यशस्वी झालेले सात, बारावी उत्तीर्ण सहा आणि पदवी प्राप्त केलेल्या चार अशा एकूण २१ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.




समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी सन्मान करण्यात आला. डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल (सी.ए.), सरपंच, पोलीस पाटील, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच आदर्श कर्मचारी पुरस्कार प्राप्त समाज बांधवांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय वयाची ७० वर्षे पूर्ण केलेल्या ४३ ज्येष्ठ नागरिकांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.




या मेळाव्यातील विशेष आकर्षण ठरले ते वैवाहिक जीवनाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या मारुतीराया सोनू रेडकर आणि भारती मारुतीराया रेडकर या दाम्पत्याचा सत्कार. शाल, श्रीफळ आणि साडी-चोळी देऊन व्यासपीठावर या दाम्पत्याचा विशेष सन्मान करण्यात आला. सहजीवनाची पन्नास वर्षे यशस्वीपणे पूर्ण केलेल्या या दाम्पत्याच्या सन्मानाने उपस्थित समाज बांधव भावूक झाले. टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.




यानंतर मंडळाकडे प्राप्त झालेल्या वधू-वरांच्या परिचयपत्रांचे वाचन करण्यात आले. ज्येष्ठ समाज मार्गदर्शक सावळाराम अणावकर, घनश्याम वालावलकर, सुधाकर खानोलकर, मालवण तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर आणि जिल्हा सचिव विष्णू चौकेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र वजराटकर यांनी केले. प्रास्ताविक व आभार तालुकाध्यक्ष रमेश नरसुले यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष शेखर तुळसकर, अरुण घोगळे, सुधाकर वेंगुर्लेकर, सीमा वेंगुर्लेकर, रमा खानोलकर, चेतन नरसुले, सौम्या नरसुले, कविता घोळेकरकर, कमलाकर सातार्डेकर, मयूर आरोलकर, गौरी तुळसकर, तन्वी नरसुले, आर्या खानोलकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!
प्रशासन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!
सामाजिक

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!
प्रशासन

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!

ANCHOR AD SLOT