जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

स्थानिक कलागुणांना व्यासपीठ देणारे उपक्रम संस्कृतीला बळकटी देतात!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

स्थानिक कलागुणांना व्यासपीठ देणारे उपक्रम संस्कृतीला बळकटी देतात!
“

पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची परंपरा जपूया भाजप युवा नेते विशाल परब

सावंतवाडी प्रतिनिधी✍️: गावातील स्थानिक कलागुणांना वाव देण्यासाठी आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे. अशा स्पर्धांमुळे नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धेसारख्या उपक्रमांतून निसर्गसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचतो. त्यामुळे स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देतानाच पर्यावरणपूरक सणांची परंपराही जपली पाहिजे, असे प्रतिपादन भाजप महाराष्ट्राचे युवा नेते विशाल प्रभाकर परब यांनी केले.




तळवणे थंडर क्रिकेट क्लब आणि नवयुवक नाट्य संपदा, तळवणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुली सोलो नृत्य स्पर्धा २०२६ तसेच तळवणे मर्यादित पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धेचे आयोजन शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी श्री देव रवळनाथ मंदिराच्या रंगमंचावर करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दोन्ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.




यावेळी विशाल परब यांनी आयोजकांनी घेतलेल्या पुढाकाराचे विशेष कौतुक केले. गावातील कलाकारांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारे असे उपक्रम भविष्यातही सातत्याने आयोजित व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.




या कार्यक्रमाला पूज्य मठाधीश राजेंद्र भारती महाराज, जिल्हा परिषद सदस्य सुधन कवठणकर, तळवणे सरपंच समीर केरकर, गुळदुवे सरपंच शैलेंद्र जोशी, गुळदुवे उपसरपंच गणपत शेटकर, भाजप युवा तालुका अध्यक्ष सिद्धेश कांबळी, भाजप सरचिटणीस नारायण कांबळी, तळवणेचे माजी उपसरपंच रंजन गावडे, रवींद्र गावडे, सावळाराम घाटये, सुधीर गावडे, सुहास गावडे, काका गावडे, बाबू गावडे, आबा शेटकर, रंजन गावडे, नाना गावडे यांच्यासह अन्य मान्यवर, आयोजक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!
प्रशासन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!
सामाजिक

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!
प्रशासन

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!

ANCHOR AD SLOT