जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

सावंतवाडीत १ नोव्हेंबरला भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

सावंतवाडीत १ नोव्हेंबरला भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा
“

जगन्नाथराव भोसले उद्यानात सायंकाळी ६ वाजता आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी✍️: ‘फिट इंडिया’ संकल्पनेतून प्रेरणा घेऊन सावंतवाडी येथे भव्य शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता जगन्नाथराव भोसले उद्यान येथे होणार आहे.




भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी युवा मोर्चाचे अध्यक्ष हितेन नाईक यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.




महाराष्ट्र राज्याचे युवा नेते विशाल भाई प्रभाकर परब यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर तसेच ज्येष्ठ नेते विनोद राऊळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.




शरीरसौष्ठवपटूंची मेहनत, शिस्त, ताकद आणि जिद्द पाहण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे. स्पर्धेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!
सामाजिक

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!
प्रशासन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!
प्रशासन

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!

ANCHOR AD SLOT