जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

विमानसेवा नियमित सुरू झाल्यानंतरच पालकमंत्र्यांनी इव्हेंट करावा वैभव नाईक

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

विमानसेवा नियमित सुरू झाल्यानंतरच पालकमंत्र्यांनी इव्हेंट करावा   वैभव नाईक
“

रो-रो बोट सेवेच्या अपयशाचा दाखला देत पालकमंत्र्यांना टोला; पाच-सहा महिने सेवा सुरळीत चालल्यानंतरच उद्घाटनाचा सोहळा करण्याची मागणी

सिंधुदुर्ग : चिपी-मुंबई विमानसेवा सोमवारपासून सुरू होत असल्याचे स्वागत करत माजी आमदार वैभव नाईक यांनी या सेवेला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, विमानसेवा प्रत्यक्षात नियमित आणि सुरळीत सुरू झाल्यानंतरच पालकमंत्र्यांनी तिचा इव्हेंट करावा, असा सल्ला त्यांनी दिला. यापूर्वी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या रो-रो बोट सेवेचे उदाहरण देत त्यांनी पालकमंत्र्यांना लक्ष केले.




यावेळी बोलताना वैभव नाईक म्हणाले की, चिपी विमानतळाचे भूमिपूजन होऊन तब्बल पंधरा वर्षांचा कालावधी लोटला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या विमानतळाचे प्रत्यक्ष उद्घाटन झाले. त्यानंतर उर्वरित कामे त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात पूर्ण करण्यात आली. त्यावेळी मुंबई-पुणे विमानसेवाही सुरू झाली होती. मात्र, सरकार बदलल्यानंतर योग्य पाठपुरावा न झाल्याने ही सेवा बंद पडल्याचा आरोप त्यांनी केला.




गेल्या चार-पाच वर्षांत अनेकदा विमानसेवा सुरू करण्याच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात सेवा सुरू झाली नाही. अनेकदा विमान उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला, तर पर्यटकांचाही हिरमोड झाला. त्यामुळे आता विमानसेवा सुरू करताना यापूर्वी झालेल्या गैरसोयींबद्दल नागरिकांची दिलगिरी व्यक्त करून ही सेवा नियमित सुरू ठेवण्यावर भर दिला पाहिजे, असे नाईक यांनी सांगितले.




यापूर्वी रो-रो बोट सेवा सुरू करताना लाखो रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्यात आली. मात्र, काही कालावधीतच ही सेवा बंद पडली. चार-पाच महिन्यांपूर्वीची ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे केवळ इव्हेंट करण्यापेक्षा सेवा टिकवून ठेवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




चिपी विमानतळासाठी अनेकांनी प्रयत्न केले असून, अनेक स्थानिक नागरिकांच्या जमिनीही या प्रकल्पासाठी गेल्या आहेत. कोकण आणि मुंबई यांच्यात पर्यटन, व्यवसाय आणि राजकीयदृष्ट्या अधिक चांगली कनेक्टिव्हिटी निर्माण होणे आवश्यक आहे. विमानसेवा नियमित सुरू राहिल्यास त्याचा मोठा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.




विमानसेवा सुरू झाल्यानंतर किमान पाच-सहा महिने ती नियमितपणे सुरू राहते का, हे पाहणे गरजेचे आहे. त्यानंतरच पालकमंत्र्यांनी तिचा इव्हेंट करावा. हा इव्हेंट पुढील तीन-चार महिन्यांनी केला तरी चालेल. विमानसेवा नियमित सुरू ठेवण्याचे आव्हान पालकमंत्र्यांसमोर असून, त्यांनी ते स्वीकारावे. या प्रयत्नांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल, अशी भूमिका माजी आमदार वैभव नाईक यांनी मांडली.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!
प्रशासन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!
सामाजिक

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!
प्रशासन

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!

ANCHOR AD SLOT