जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

कणकवली नगरपंचायतीच्या नूतन सभागृहाचे २० नोव्हेंबरला लोकार्पण

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

कणकवली नगरपंचायतीच्या नूतन सभागृहाचे २० नोव्हेंबरला लोकार्पण
“

परमपूज्य भालचंद्र महाराज सभागृहासह परिसराचे सुशोभीकरण; ५० लाख रुपये खर्चून काम पूर्ण

कणकवली प्रतिनिधी✍️ : कणकवली नगरपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत सुमारे ५० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या परमपूज्य भालचंद्र महाराज सभागृहाचे आणि नगरपंचायत इमारत परिसर सुशोभीकरण कामाचे लोकार्पण शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता नगरपंचायत कार्यालयात करण्यात येणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.




नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक बाळू पारकर, जयेश धुमाळे, जाई मुरकर, सुमेधा अंधारी, लुकेश कांबळे आदी उपस्थित होते.




नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभा, विशेष सभा तसेच स्थायी समितीच्या बैठका यापुढे या नव्या आणि अत्याधुनिक सभागृहात पार पडणार आहेत. विधानसभा तसेच लोकशाही व्यवस्थेतील अन्य महत्त्वाच्या सभागृहांच्या धर्तीवर या सभागृहाची रचना करण्यात आली आहे. कणकवली शहराच्या प्रतिष्ठेला साजेसे असे प्रशस्त आणि आकर्षक सभागृह उभारण्यात आले आहे.




या लोकार्पण सोहळ्याला नगरपंचायतीचे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे सर्व नगरसेवक, शहरातील प्रमुख मान्यवर तसेच नागरिक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी कणकवली शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.




नगरपंचायतीच्या सभागृहात शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा, विचारविनिमय आणि संवाद घडत असतो. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात लोकशाही पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात होणाऱ्या चर्चेतून शहराच्या विकासाचे निर्णय घेतले जातात. या लोकशाही परंपरेला अधिक आधुनिक आणि दर्जेदार स्वरूप देण्याच्या उद्देशाने नव्या सभागृहाची उभारणी करण्यात आली आहे.




कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हे नूतन सभागृह महत्त्वपूर्ण ठरणार असून, या लोकार्पण सोहळ्याला शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष संदेश पारकर आणि उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

संविधान दिनानिमित्त वेंगुर्ल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित वेशभूषा स्पर्धा
सामाजिक

संविधान दिनानिमित्त वेंगुर्ल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित वेशभूषा स्पर्धा

दाभोलीत २५ व २७ नोव्हेंबरला सातेरी-गिरोबा जत्रोत्सवाचा उत्साह; दशावतार नाटकांची मेजवानी
सांस्कृतिक

दाभोलीत २५ व २७ नोव्हेंबरला सातेरी-गिरोबा जत्रोत्सवाचा उत्साह; दशावतार नाटकांची मेजवानी

तुळशी विवाह : भक्ती, श्रद्धा आणि मांगल्याचा पवित्र सोहळा!
सांस्कृतिक

तुळशी विवाह : भक्ती, श्रद्धा आणि मांगल्याचा पवित्र सोहळा!

ANCHOR AD SLOT